गावाविषयी माहिती
गारगाई नदी नदीच्या संगमावर उज्जैनी हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.उज्जैनी गावात गावदेवी मंदिर व हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १९९६ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ६, अंगणवाडी केंद्रे ६ व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत उज्जैनी ने ग्रामस्थ पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच गावात पुरातन मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून मोगरा हे ही प्रमुख पिके घेतली जातात.
उज्जैनी ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत उज्जैनी .गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ८सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
उज्जैनी गाव आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.